
मालवण : महायुतीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा मालवण येथे होतं आहे. शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे म्हणाले, प्रचाराला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. काही दिवसात कसलाही अपप्रचार होईल. अनेक अफवा उठतील. कसल्याही अफवाना आता जनता बळी पडणार नसल्याचे निलेश राणे म्हणाले.