
मालवण : महायुतीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा मालवण येथे होतं आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, या मतदार संघात सर्व कार्यकर्ते गावागावात काम करत आहेत. माझे आणि उदय सामंत यांचे संबंध असून मी निवडणुकीला उभं राहणार असे सांगितले गेले. आमचे मैत्रीचे संबंध होते. आपला स्वार्थ साधावा असे कुठलेही काम करण्यासाठी मी कुणाकडे गेलो नाही. निलेश राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन विधिमंडळात जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. उबाठाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या जिल्ह्यातील तीनही आमदार महायुतीचे असतील असे सामंत यांनी सांगितले.