लोकसभा झांकी है....निलेश राणे बाकी : एकनाथ शिंदे

विजयाचे फटाके फोडायला येईन !
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 23, 2024 15:29 PM
views 368  views

कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत जाहीर प्रवेश // मुख्यमंत्री शिंदे यांनी मानले खासदार नारायण राणे यांचे आभार // आजचा दिवस शिवसेनेसाठी ऐतिहासिक दिवस // निलेश राणे स्वगृही परतले // निलेश राणे यांच्या प्रवेशाने महायुतीच्या प्रचाराला केली सुरुवात // लोकसभेला मिळालेले लीड विधानसभेत 52 हजाराचे होईल // लोकसभा झांकी है....निलेश राणे बाकी है // शिवसेना भाजपा वेगळं नाही // दिवाळीत फटाके फोडाल पण 23 तारिखला निलेश राणे यांच्या विजयासाठी फटाके फोडायला मी येणार // नारायण राणे यांनी ज्या पक्षातून सुरुवात केली त्या पक्षात निलेश राणे आले // धनुष्यबाण कोकणच्या सुपुत्राच्या हातात शोभून दिसतो // निलेश राणे यांच्या प्रवेशाने महायुतीला बळ मिळाले // महाविकास आघाडी सरकार असताना सर्वच कामाना स्थगिती होती // मी धाडस करून महायुतीच सरकार आणले // बाळासाहेबांच्या विचारासाठी सत्तेवर लाथ मारली // बाळासाहेबांच्या विचारांशी काँग्रेसमोर ज्यांनी घुडगे टेकले त्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले // कुडाळ मालवणच्या विकासासाठी निलेश राणे शिवसेनेत आले // विरोधी उमेदवाराचे डिपॉजिट जप्त होणार // भाजपाबरोबर आमची युती आहे // ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात // कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला // एक शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री पर्यंतचा नारायण राणे यांचा प्रवास मी बघितला // कार्यकर्त्याच्या पाठीशी कसे राहायचे हे राणे साहेबांकडून शिकावे // फेक नरेंटिव्ह पसरवलं // अशा परस्थितीत राणे साहेबांना विजयी केल्याबद्दल आभार मानले // नारायण राणे यांनीच शिवसेना वाढवली // त्यावेळी आम्हाला पेट्रोल सुद्धा मिळत नव्हते // शिवसेनेत कधीच फाटाफूट झाली नसती तर शिवसेनेला कोणीही हरवू शकले नसते // पण चांगल्या माणसांचं खच्चीकरण करण्याचे काम केले // बाळासाहेब असताना दिल्लीतले लोकं मुंबईत यायचे // आता हे दिल्लीतील गल्लीच्या गल्ली त्यांना फिरावे लागत आहे // कोकणात एकही उबाठाचा खासदार निवडून आला नाही // शिवसेना भाजपा ही जुनी युती आहे // परंतु या युतीला कलंकित करण्याचे काम केले त्यांची अवस्था आपण पाहत आहात // लोकसभेला त्यांना काँग्रेसची मते मिळाली // राज्यात आज अनेक प्रकल्प सुरु केले आणि पूर्ण देखील केले // मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टात गेली // त्यांना योग्य वेळी जोडा दाखवील्याशिवाय राहणार नाही // महिलांना लखपती बनविल्याशिवाय राहणार नाही // विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करतोय // कोकण विकास प्राधिकरण केलं आहे // विकास हाच आपला अजेंडा // निलेश राणे यांच्या पाठीशी राहा // राज्यात पुन्हा महायुतीचा झेंडा फडकणार // एकनाथ शिंदे