
सावंतवाडी : आमदार निलेश राणे हे सर्वसामान्यांचा आवाज असणारे नेतृत्व असून खासदार म्हणून त्यांनी मोठं कार्य केलं होतं. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील अनेक रस्ते त्यांनी मंजूर केले. झाराप पत्रादेवी बायपास मार्गी लावला. आता आमदार म्हणूनही ते अत्यंत अभ्यासपूर्ण काम करत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो व याही पुढेही त्यांच्या हातून कोकण विकासाचं मोठं कार्य घडो अशा शब्दांत माजी मंत्री आम. दीपक केसरकर यांनी आमदार निलेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडी येथील हॉटेल मॅंगोच्या सभागृहात संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशन यांच्या माध्यमातून आ. निलेश राणे यांचा वाढदिवस शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आ. दीपक केसरकर, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका प्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, जावेद खतिब, गुरुनाथ सावंत, मंदार नार्वेकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, दिनेश गावडे, भाजप शहरप्रमुख अजय गोंदावळे, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, प्रल्हाद तावडे, सुजित कोरगावकर, प्रसन्ना शिरोडकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी आम. राणे म्हणाले, संजू परब सारखे माझे मित्रच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून माझा वाढदिवस साजरा करतात. त्यांचं हे प्रेमच मला अधिक ऊर्जा देतं. मला देवाऱ्ह्यातील देव कधी भेटला नाही. पण, जिवनात देवासारखी अनेक माणसं भेटली याचाच आनंद आहे अशा शब्दांत आ. निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांप्रती ऋण व्यक्त केले.
यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी निलेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी, संतोष गांवस, ज्ञानेश्वर सावंत, क्लेटस फर्नांडीस, संदेश सोनुर्लेकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, परिक्षीत मांजरेकर, सुधा कवठणकर, दिनेश गावडे, सिताराम गावडे, भाजपच्या प्रदेश सदस्य तथा सावंतवाडी शहर महिला आघाडी प्रमुख मोहिनी मडगांवकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, सुशांत पांगम, झेवियर फर्नाडीस, दीनानाथ नाईक, प्रसन्ना शिरोडकर, प्रल्हाद तावडे, प्रताप परब, समीर पालव, संजय नाईक, प्रतीक बांदेकर, प्रवीण साठे, देव्या सूर्याजी, तात्या वेंगुर्लेकर, बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर, समीर पालव यांसह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.