
सावंतवाडी : इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार झेविअर फर्नांडिस व पंचायत समिती उमेदवार रामचंद्र चराटकर यांच्या प्रचारार्थ इन्सुली खामदेव नाका येथे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी घेतल्या व मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी आमदार राजन तेली, तालुकाप्रमुख बबन राणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते










