कार्यकर्त्यांच्या स्वागताने निलेश राणे भावूक

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 27, 2023 19:18 PM
views 207  views

कुडाळ : निलेश राणे तुम आगे बढो..... हम तुम्हारे साथ है..... हमारा नेता कैसा हो निलेश राणे जैसा हो..... अशा घोषणा देत २०० गाड्यांच्या ताप्यासह भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांचे झाराप ते कुडाळ भाजप कार्यालयापर्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी सांगितले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेम दिलं हे माझ्यासाठी मोठं आहे. त्यांचे ऋण मी आभार मानून व्यक्त करू शकत नाही असे सांगितले.


भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या राजकारणातून तुम्ही बाहेर पडू नका असे त्यांना सांगितले त्यानंतर मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पुन्हा सक्रिय राजकारणात येण्याचे त्यांनी निश्चित केले. आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण झाला विधानसभा प्रभारी निलेश राणे हे कुडाळ मालवण दौऱ्यावर असल्याचे कार्यकर्त्यांना समजल्यावर बांदा त्यानंतर झाराप येथे माजी खासदार निलेश राणे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. २०० गाड्यांचा ताफा त्यांच्या स्वागतासाठी होता तसेच घोषणाबाजी करण्यात आली झाराप ते कुडाळ भाजप कार्यालयापर्यंत ही स्वागत रॅली काढण्यात आली. यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले. 


स्वागत झाल्यानंतर कुडाळ भाजप कार्यालय येथे कुडाळ- मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी सांगितले की, माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या सगळ्यांनी जे प्रेम दिल त्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत तरी पण आभार हा फार छोटा शब्द आहे. मी नेहमी कार्यकर्त्यांच्या ऋणातच राहीन. जे काही त्यांनी माझ्यासाठी उभं केलं. ते सांगणं कठीण असल्याचे सांगत माजी खासदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. तसेच ते म्हणाले कार्यकर्त्यांनी जे मागच्या काही दिवसांपासून चित्र उभं केलं. पण निलेश राणे तसा फार लहान माणूस असताना कार्यकर्त्यांनी परत प्रवाहात आणले. यात कार्यकर्त्यांचा फार मोठा वाटा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटलो त्यांनी जो मला विश्वास दिला त्या विश्वासावर परत कामाला लागलो. माझी आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली यामध्ये जे काही चर्चेत झालं तसं १०० टक्के होईल असा माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच मी आता कामाला लागलो आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. वाटत होतं ते मी माझ्या नेत्यांना सांगितला आहे. आणि माझा माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. कोकण असेल कुडाळ मालवण असेल नेत्यांच्या सांगण्यावरून निवडणूकांमधील सर्व जागा निवडून आणायच्या अनुषंगाने आता काम सुरू केला आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या या सर्व जागा असतील त्या १०० टक्के निवडून येतील हा माझा विश्वास आहे. 

आपण राणे 

यावेळी महामार्गावर टायगर इज बॅक हे बॅनर झळकत असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला यांनी उत्तर दिले की, आपण टायगर वैगरे नाही आपण राणे. मला टायगर वगैरे यामध्ये पडायचं नाही.