
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरतायत. त्यापूर्वी सभा सुरु आहे. यावेळी माजी खासदार निलेश राणे बोलत होते.
माझ्यासाठी लोकसभेला व्हॅनमधून गावागावात प्रचार करणारे दीपक केसरकर आहेत. ते सावंतवाडीचे आमदार म्हणून शोभून दिसत आहे. समोर कोणी उमेदवार राहिला नाही. विरोधकांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही. महायुतीच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी लोक रस्त्यावर उतरली असून तुमच्यासाठी जेवढं लागेल तेवढ सहकार्य करणार. विजयासाठी दिवसरात्र एक करणार असा विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केला. लोकसभेची परतफेड विधानसभेत करणार असा विश्वास व्यक्त केला.