निलेश राणे झाले आक्रमक ; पोलीस ठाण्यात मांडला ठाण

Edited by: भरत केसरकर
Published on: December 30, 2023 11:02 AM
views 420  views

कुडाळ : उबाठा सेनेने विकसित भारत संकल्प यात्रा कुडाळात रोखल्या नंतर भाजपचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे प्रभारी निलेश राणे प्रचंड आक्रमक झाले आहेत. उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी हि यात्रा कुडाळ नगरपंचायतीजवळ येताच रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर निलेश राणे थेट मुंबईवरून गोव्यात येत थेट कुडाळात दाखल झाले. कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल होत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

निलेश राणे यांनी पोलीस निरीक्षण ॠणाल मुल्ला यांच्या कार्यालयात ठाण मांडला. पोलीस उपधीक्षक संध्या गावडे यांना धारेवर धरल.त्यांच्यासह दीडशे ते  दोनशे भाजप कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. जोपर्यंत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर 353 अर्थात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका निलेश राणे यांनी घेतली. त्यामुळे कुडाळच्या पोलीस प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली. निलेश राणे यांच्यासह सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साहिल, मोहन सावंत, आबा धडा, कुडाळ नगरपंचायतीचे भाजपचे नगरसेवक गणेश भोगटे, निलेश परब,चांदणी कांबळी,पप्या तवटे,रूपेश कानडे,भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी ठाण मांडून होते.