निलेश राणेंकडून विकासकामांचा धडाका

nilesh rane
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 23, 2023 15:26 PM
views 680  views

कुडाळ : तालुक्यातील बाव व आंबडपाल येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बाव माजी सरपंच नागेश परब आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री यांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले. गेली अनेक वर्षे बाव गावातील रस्ते हे खड्डेमय परिस्थितीत होते. निलेश राणे यांच्याजवळ या संदर्भात मागणी केली असता त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्याचे आभार अश्या शब्दात बाव माजी सरपंच तथा शक्तिकेंद्र प्रमुख नागेश परब यांनी आभार व्यक्त केले आहेत. यावेळी बाव बूथ अध्यक्ष सुनील वेंगुर्लेकर, आंबडपाल बूथ अध्यक्ष शुभम सावंत, सागर चव्हाण, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, माजी जि. प. अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, जिल्हा कार्यकारणी सदस्य पप्या तवटे, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, जयेश चिंचळकर, प्रकाश पावसकर आदी उपस्थित होते.