LIVE UPDATES

तोपर्यंत कोकणातली विद्युत यंत्रणा निकामी ठरणार

निलेश राणेंनी सांगितलं वास्तव
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 21, 2025 14:55 PM
views 289  views

मालवण : कोकणातील विद्युत यंत्रणा ही अनेक वर्षांपासून फक्त दुरुस्ती वर अवलंबून आहे. जोपर्यंत आपण वादळ, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि सरासरी चार हजार मिलिमीटर पाऊस हिशोबात घेत नाही तोपर्यंत तळ कोकणातली ही विद्युत यंत्रणा अशीच निकामी ठरणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली. 

कालच्या पहिल्याच मुसळधार पावसात मालवणची बत्ती गुल झाली होती. तळ कोकणात गेली कित्त्येक वर्षे पावसामुळे विजेचा लपंडाव सुरूच असतो. आमदार निलेश राणे यांनी आमदार झाल्यानंतर पाहिल्याच अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. काल पडलेल्या पावसातही मालवण अंधारात गेले होते. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे, मी अनेक वर्षांपासून सांगत आलोय कोकणातला पाऊस हा एक महत्त्वाचा निकष आहे. विद्युत यंत्रणा ही अनेक वर्षांपासून फक्त दुरुस्ती वर अवलंबून आहे, जोपर्यंत आपण वादळ, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि सरासरी चार हजार मिलिमीटर पाऊस हिशोबात घेत नाही तळ कोकणातली ही विद्युत यंत्रणा अशीच निकामी ठरणार आहे. 

यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.