
मालवण : मालवण तालुक्यातील बेलदार भटका समाज संघटनेने खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. समाज बांधवांचे जातींचे दाखले, रोजगाराच्या समस्या, घरे, ठेकेदारी व्यवसाय समस्या, महिलांना लघु उद्योग करताना येणाऱ्या अडचणी या सर्वांवर महायुती सरकार तसेच निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच न्याय मिळेल असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी संघटना तालुकाध्यक्ष अशोक मोहिते, अंकुश पवार, नितेश पवार, किशोर पवार, दीपक चव्हाण, राकेश पवार, रमेश पवार, बाळासाहेब मोहिते, पंडित मोहिते, रघुनाथ मोहिते, संतोष चव्हाण, राजेश मोहिते, चंद्रकांत पवार, गिरीश चव्हाण, यश चव्हाण, बिकाजी मोहिते, दिलीप पवार, मोहन पवार, मामा पवार, दीपक मोहिते, लखन मोहिते, सत्यवान चव्हाण, सुखदेव चव्हाण, आदी उपस्थित होते.