
मालवण : आमदार वैभव नाईक यांनी शहरातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावली नाहीत, त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही असा आरोप करत उबाठा महिला तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख अंजना सामंत यासह त्यांचे पती दत्तप्रसाद सामंत, मुलगा ऋषिकेश सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचे जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, उपतालुकाप्रमुख प्रियंका मेस्त्री, यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेवर अन्यायकारक मालवण शहर विकास आराखडा रद्द व्हावा याबाबत नागरिकाची भूमिका असतानाही आमदारांनी आवाज उठवीला नाही. ते अपयशी ठरले. त्यासोबतच ग्रीन झोन, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. मालवण उबाठात हेवे दावे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ज्या ठिकाणी जनता एकवटते त्या मालवण बस स्थानकाचा प्रश्न सहा वर्षे सोडवता सोडवता आला नाही. त्यामुळे विकासाचा दृष्टिकोन ठेऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत. विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास यावेळी अंजना सामंत यांनी व्यक्त केला.