
मालवण : वैभव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी सुकळवाड येथील सुभाष म्हैसकर यांचा उबाठा गटात पक्षप्रवेश दाखवला होता. यावर बोलताना कालच निलेश राणे यांनी सातत्याने होणाऱ्या या बोगस पक्षप्रवेशाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर आज सुभाष म्हैसकर यांनी मालवण येथे येऊन खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. आपण व सुकळवाड येथील संपूर्ण ठाकर समाज हा राणे कुटुंबासोबत आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे.