
मुंबई : अखेर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेलाच सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी खासदार निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटातून लढणार असून २३ तारिखला निलेश राणे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे समजते.
गेले अनेक दिवस भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. महायुतीच्या नेत्यांच्या जागा वाटपाबाबत मुंबई, दिल्लीत बैठका बैठकांचे सत्र सुरु होते. या जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेना शिंदे गटाला सुटल्याची माहिती प्राप्त झाली आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. येत्या २३ तारिखला निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.