
मालवण : मालवण आचरा लगतच्या समुद्रात काही दिवसांपूर्वी मासेमारी नौका दुर्घटनेत सर्जेकोट मच्छीमार सोसायटीचे उपाध्यक्ष गंगाराम ऊर्फ जीजी जनार्दन आडकर, लक्ष्मण सुर्वे रा. हडी, प्रसाद सुर्वे रा. हडी यांचा मृत्यू झाला. भाजपा नेते निलेश राणे यांनी गुरुवारी आडकर, सुर्वे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. आपण सोबत असल्याचे सांगत कुटुंबियांना धीर दिला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकार, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, दाजी सावजी, हरीश गांवकर यांसह अन्य पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.