निलेश राणेंनी चोडणेकर कुटुंबियांना दिला धीर !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 12, 2024 14:28 PM
views 344  views

मालवण : तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय 55) या मच्छिमार कुटुंबियांची भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी भेट घेत धीर दिला.

दरम्यान, बेपत्ता मच्छिमार शोध बाबत प्रशासनाकडून सूरू असलेल्या शोध कार्याचा आढावाही निलेश राणे प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून घेतला.  यावेळी भाजप पदाधिकारी अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, बाबा परब, राजन गांवकर, महेश मांजरेकर, दीपक सुर्वे, संजय तारी, अण्णा कोचरेकर यांसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर (वय -55) हे मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय - 14) वर्षे आणि खालशी धोंडीराज परब (वय 55 वर्षे) रा. तारकर्ली यांसह तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन शनिवारी रात्री मासेमारीसाठी गेले होते. यावेळी अचानक वाढलेल्या वाऱ्या व पावसात होडी उलटली. तीनही जण पाण्यात बुडाले. लावण्य हा पोहून बाहेर आला आणि बचावला. तर बेपत्ता धोंडीराज यांचा मृतदेह रविवारी सापडला. मात्र किशोर यांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यांचा शोध ग्रामस्थ, प्रशासनान व शोध पथकाच्या माध्यमातून सूरू आहे.