'सी वर्ल्ड' नोटिफिकेशन ठाकरे गटाने सत्ताकाळात का रद्द केले नाही ? : निलेश राणे

ठाकरे गटाचे सरपंच रुपेश पाटकर भाजपात
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 01, 2024 08:42 AM
views 200  views

मालवण : सी वर्ल्ड प्रकल्पाला ठाकरे गटाचा विरोध हा केवळ निवडणुकीतील मतांसाठी होता. प्रकल्पाला खरा विरोध होता तर ठाकरे गटाने सत्ताकाळात सी वर्ल्ड प्रकल्प नोटिफिकेशन का रद्द केले नाही? सी वर्ल्ड प्रकल्पा बाबत ठाकरे गटाने केवळ विरोधाचेच राजकारण केले. मतदार संघात तसेच राज्यातील सर्वच प्रकल्पा बाबत जनतेला भडकवून राजकारण करणे. हेच काम ठाकरे गटाचे आहे. असा घणाघाती प्रहार भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे गटावर केला. दरम्यान सी वर्ल्ड प्रकल्पाला  ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता आमचाही प्रकल्पाला विरोधच राहील. हीच भुमिका आमची कायम राहील. असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले. 

मालवण तालुक्यातील वायंगणी गावचे ठाकरे गटाचे सरपंच रुपेश पाटकर यांसह अनेक ग्रामस्थानी भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी निलेश राणे यांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. प्रकल्पावरून केवळ राजकारण सूरू आहे. कोणताही विकासनिधी गावात येत नाही. गावच्या विकासासाठी स्थानिक आमदार नाईक, खासदार राऊत यांचे कोणतेही व्हिजन नाही. हे सरपंच रुपेश पाटकर यांनी ओळखले. गावच्या गतिमान विकासासाठी त्यांनी भाजपा पक्षात येणाच्या निर्णय घेतला. आम्ही सर्व भाजप कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहोत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वायंगणी गावच्या सर्वांगीण व गतिमान विकाससाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यापुढे विकासकामांच्या बाबत वायंगणी गाव अग्रक्रमांच्या यादीत असेल असेही निलेश राणे यांनी सांगितले. 

देशात या लोकसभा निवडणुकीत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यावेळी पंतप्रधान होणार. सोबत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून राणे साहेब खासदार होऊन मंत्री होणार. हक्काचा विकासनिधी या मतदारसंघात येणार. राणे साहेबांचे विशेष प्रेम येथील जनतेवर आहे. सर्वाना ते आपले कुटुंब मानतात. त्यामुळे विरोधकांनी कितीही खोटे राजकारण करून जनतेची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला तरी जनता राणे साहेबांसोबत आहे. हे या प्रवेशाच्या माध्यमातून दिसून आले. असेही निलेश राणे म्हणाले.

वायंगणी येथे आयोजित कार्यक्रमात सरपंच रुपेश पाटकर यांसह भाजपा प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, ग्राप सदस्य मालती जोशी, शामसुंदरनाईक, सदस्य अर्चना सावंत, संजय सावंत, उमेश सावंत, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, संतोष गावकर, दिपक पाटकर, रावजी सावंत, अण्णा धुळे, हनुमान प्रभू, बाळू वस्त, संतोष कोदे, डॉ. प्रमोद कोळंबकर, मंगेश गांवकर, मनोज हडकर, प्रफुल्ल प्रभू, सुशील शेडगे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक हनुमंत प्रभू यांनी करताना राणे साहेबांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावागावात झालेल्या विकासकामांची माहिती दिली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राणे साहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया असे आवाहनही या निमित्ताने त्यांनी केले. 

दत्ता सामंत म्हणाले, राणे साहेबांनी गावावर अन्याय केला नाही. मात्र विरोधकांनी नेहमीच राजकारण केले. राणे साहेबानी कोणतीही दडपशाही कधीही केली नाही. मात्र येथील अपयशी आमदार खासदार यांनी कोणताही विकासनिधी न आणता  जनतेला भडकवत राजकारणच केले. मात्र आता विरोधकांचे डाव जनतेच्या लक्षात येत आहेत. जनता राणे साहेबांसोबत पुढे आहे. निस्वार्थीपणे काम करणारे येथील सरपंच यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपात प्रवेश केला. राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून गावाचा गतिमान विकास होईल असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. 

मोठ्या संख्येने प्रवेश

वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांसह पाटवाडी, भंडारवाडी, दुखंडेवाडी, घाडीवाडी येथील अनेकांनी भाजपात प्रवेश केला. यात प्रदीप घाडी दशरथ घाडी, तुकाराम घाडी, उल्हास घाडी, विकास परब, विलास घाडी, गोविंद घाडी, विश्वनाथ घाडी, भार्गव सावंत, अर्चना सावंत, विलास सावंत, आत्माराम सावंत, दीपक सावंत, चतुर सावंत, मंगेश मसुरकर, संदीप सावंत, नंदकिशोर सावंत, राजाराम सावंत, गणेश सावंत,  प्रभाकर माळपेकर, प्रतिभा माळपेकर, राजेंद्र सावंत, जिपी सावंत, जयवंत परब, प्रतीक सावंत, सदाशिव सावंत, समृद्धी सावंत, महादेव सावंत, रिया सावंत, वैशाली सावंत, संजय सावंत, गोविंद सावंत, सदानंद सावंत, रोहन सावंत, सुरेश सावंत, संजना सावंत, दिपाली सावंत, गणपत सावंत,  रितेश लाड, शुभम त्रिंबककर, दिनेश पेडणेकर, गौरव पेडणेकर, सचिन पेडणेकर, आर्यन धुळे, महादेव सावंत, प्रथमेश सावंत, महेंद्र सावंत, ओमकार सावंत, प्रकाश सावंत, विजय सावंत, महेश सावंत, उमेश माळपेकर, गणेश माळपेकर, विनय सावंत, गोविंद दुखंडे, मंगेश दुखंडे, मोहन दुखंडे, दाजी दुखंडे, हर्षद दुखंडे यांसह अनेक ग्रामस्थ यांनी भाजपात प्रवेश केला.