निखिल साटम यांची AIBEA च्या सिंधुदुर्ग - रत्नागिरी समन्वयक पदी निवड

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 04, 2023 17:01 PM
views 454  views

सिंधुदुर्ग : बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी काॅ. निखिल साटम यांची महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी समन्वयक पदी निवड झाली. रविवारी झालेल्या बँक मेळाव्यामध्ये ही निवड करण्यात आली ऑल इंडिया बँक एम्प्लॉयर असोसिएशन महाराष्ट्र युनिट आहे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व कॉ निखिल साटम हे करणार आहेत.

या आधी देखील बँक कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व ग्राहकांच्या हितासाठी त्यांनी नेहमी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवला होता आणि आता त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण नेहमीच कार्यरत असणार असल्याचे निखिल  साटम  यांनी सांगितले.