
वेंगुर्ला : वाईंगणकर फिटनेस देवगड जामसंडे व कोकण सिंधू पॉवरलिफ्टींग असोसिएशन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत वेंगुर्ला येथील नाईक जिम अँड फिटनेस सेंटरच्या स्पर्धकांनी उज्वल यश संपादन केले आहे.
यात गौरवी मांजरेकर हिने ५२ किलो वजनी गट सब - ज्युनिअर मध्ये तृतीय क्रमांकासहित ब्रॉंझ मेडल, सिनियर ग्रुप मध्ये द्वितीय क्रमांकासहित सिल्व्हर मेडल, अस्मी थल्हा हिने ७२किलो वजनी गट सब - ज्युनिअर मध्ये प्रथम क्रमांक सहित गोल्ड मेडल, समर राणे याने ५९ किलो वजनी गट सब - ज्युनिअर मध्ये तृतीय क्रमांक सहित ब्रॉंझ मेडल, विनय जाधव याने १००kg वजनी गट ज्युनिअर मध्ये द्वितीय क्रमांक सहित सिल्व्हर मेडल, देवेंद्र तुळसकर याने ५३किलो वजनी गट सब - ज्युनिअर मध्ये उत्तेजनार्थ क्रमांक, हृतिकेश पालव याने ६६ किलो वजनी गट ज्युनिअर मध्ये उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.