
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील निकम फाउंडेशन संचालित निकम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेन पदवी प्रदान सोहळा नुकताच पार पडला. यावेळी तालुक्यातील नामांकित गायनकोलॉगिस्ट डॉ. कांचन मदार ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सुरुवात डॉक्टर नागमणी मॅडम यांनी केली. मान्यवरांचे स्वागत निकम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अमोल निकम यांनी करून दिपप्रज्वलन डॉक्टर कांचन मदार डॉक्टर अमोल निकम उपाध्यक्ष सुहासिनी निकम फाउंडेशन खजिनदार आदिती निकम तसेच डॉ. शिरीष मदार यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सदर प्रसंगी रेवती भुवड डी एल एम टी,Ms. आकांक्षा खोपडकर नर्सिंग असिस्टंट, सानिका साळवी डी एल एम टी, लावू सुर्वे लॅपरोस्कोफी असिस्टंट, श्वेता भुवड डी एल एम टी निकम फाउंडेशन संचालित निकम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेन च्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सावर्डे सारखे गावात निकम फाउंडेशन नी डॉक्टर अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विद्यार्थी मेडिकल फिल्ड मध्ये पदवी घेतलाचा वेगळाच आनंद आम्हाला व आमच्या कुटुंबियांना झाला आहे असे विद्यार्थी भावूक वक्तव्य केले आणि गुरुवर्य डॉक्टर अमोल निकम यांच्या आशीर्वाद घेतले.
मान्यवरांचे मनोगत व्यक्त होऊन तसेच आभार प्रदर्शन आदिती निकम यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी निकम फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी तसेच डॉक्टर नागमणी, डॉक्टर पूजा भुरण, विनायक सावंत, रवीका घाणेकर, सुहासिनी निकम, सविता सायली चव्हाण, सिद्धी सावंत, सुदर्शन शिंदे. प्रणय सकपाळ, अमर सावंत, तसेच निकम हॉस्पिटल चा सर्व आजी माजी स्टाफ, इन्स्टिट्यूट चे सर्व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते...










