राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास राज्यस्तरीय काव्य पुरस्कार प्रदान

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 01, 2023 20:32 PM
views 97  views

कणकवली : जेष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांच्या हस्ते कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला सारांश मासिक च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठासाठी चित्रकार नामानंद मोडक याना प्रदान करण्यात आला.सारांश मासिकाच्या वतीने सन 2022 मधील साहित्य कृतींसाठी जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वितरण 25 जून रोजी मिरज येथील बायसिंगर स्मृती ग्रंथालयात करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यीक भीमराव धुळूबूळ, डॉ विनोद परमशेट्टी यांच्यासह कामगार आयुक्त अनिल गुरव, मिरज आय एम ए चे अध्यक्ष डॉ.नथानियल ससे, सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र कुल्लोळी, डॉ विल्यम इसापुरे, दीपक ढवळे, मासिक सारांश चे संपादक रंगराव शिंपुगडे, सल्लागार संपादक डॉ.अनिल दबडे, उपसंपादक डॉ.विजयकुमार माने, डॉ.दीपक कामले, प्रकाश माने, ऋजुता कुलकर्णी,श्रीशैल चौगुले, नीता शिराळकर, त्रिशला शहा, आशा धनाले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जेष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांनी स्त्रियांच्या साहित्याचा आढावा घेताना पुराणातील सीता, द्रौपदी तसेच लोक साहित्यातील ओव्यांचे समर्पक दाखले दिले.

कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला याआधीही राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.0 संविधानिक मूल्यांवर आधारित संयत  विद्रोहवादी असलेल्या आणि मानवतावाद जोपासणाऱ्या सकारात्मक कविता हे राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच  अल्पावधीत वाचक आणि परीक्षकांच्या पसंतीस उतरलेला काव्यसंग्रह म्हणून राखायला हवी निजखूण ची मराठी साहित्य विश्वात दखल घेतली गेली आहे. या पुरस्काराबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.