
बांदा : निगुडे गावातून नेहमीच ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबतीत नेहमीच ग्रामस्थांकडून तक्रारीही केल्या गेल्या आहेत. आज १८ जुलैला सकाळीच खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची चाक रस्त्यात रुतली होती. यामुळे रस्ताही खचला होता. या रस्त्याचं काम मे महिन्याच्या अखेरीच करण्यात आलं होत. त्यामुळे या कामाबाबतही ग्रामस्थांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे ST वाहतूक बंद झाल्यास शालेय मुलांचे हाल होणार आहेत.
दरम्यान, ओव्हरलोड वाहतुकीसंदर्भात अनकेदा ग्रामस्थांनी संबधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. आज डंपर अडकल्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आजही याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतलेला दिसून आला. त्यामुळे संबधित विभागाने याकडे गांभीर्याने पहावे आणि कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.