निगुडे माऊली मंदिरात हरीनाम सप्ताह

विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन
Edited by: भगवान शेलटे
Published on: August 17, 2025 13:14 PM
views 40  views

बांदा : निगुडे गावचं ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट व बुधवार दिनांक २० ऑगस्टला दोन दिवशीय वार्षिक हरिनाम सप्ताह सोहळा साजरा होत आहे. मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट पासून दुपारी  १२:००  वाजता हरीनाम सप्ताह सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.

यावेळी इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली, रोणापाल, मडूरे, निगुडे गावातील ग्रामस्थांची भजने होतील. बुधवारी दुपारी १२:०० नंतर दिंडी आरती होऊन हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता होईल तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती, निगुडे, मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.