निगुडे माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात भरगच्च कार्यक्रम

Edited by:
Published on: October 03, 2024 06:41 AM
views 389  views

बांदा :  निगुडे श्री देवी माऊली मंदिरात नवरात्र उत्सव निमित्त श्री देवी माऊली नवरात्र उत्सव समिती निगुडे  व गावातील वाडीतील ग्रामस्थांच्या वतीने नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम,  दररोज दुपारी आरती, महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तरी दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी सकाळी ०८:००  वाजता श्री देवी माऊलीची विधीवत पूजा व घटस्थापना कार्यक्रम, रात्रौ ०९:००  वाजता श्री विघ्नहर्ता दशावतार नाट्य मंडळ निगुडे प्रस्तुत श्री. नाना राणे यांचा *माता वैष्णोदेवी महिमा* नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवार ०४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ०७:०० वाजता महिलांची महाआरती रात्रौ ०९:०० वाजता ग्लोइंग स्टार दांडिया ग्रुप आरोंदा यांचा ट्रिक्ससिन युक्त बहादर दांडीया नृत्य, शनिवार ०५ ऑक्टोबर रोजी रात्रौ ०९:०० वा. श्री. कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, नेरूर स्वतः मालक बाबी कलिंगण  निर्मित  भाई कलिंगण प्रस्तुत अनंत चतुर्थीचा महिमा रविवार दि. ०६ ऑक्टोबर  रात्रौ ८:०० स्थळकर दांडिया गृप तळवडे यांचा ट्रिकसिन युक्त दांडिया, रात्रौ ०९:०० *महिला फुगडी*, शेर्ले  सोमवार ०७ ऑक्टोबर रोजी रात्रौ ०९:०० वाजता श्री.मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ मोरे यांचा *दंतेश्वरी महिमा* दणदणीत नाट्यप्रयोग,  मंगळावर दि. ०८ ऑक्टोबर रात्रौ ०८: ०० आरोसकरटेंब संयुक्त भजन व रात्रौ  ०९:०० महिला फुगडी, बुधवार दि. ०९ ऑक्टोबर रोजी रात्रौ ०९:०० निगुडे ग्रामस्थ, तेलवाडी भजने , गुरुवार दि. १० ऑक्टोबर रात्रौ ०९:०० श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ, मळगांव श्री. नितीन आसयेकर प्रस्तुत *धृणेश्वर तीर्थ* दणदणीत नाट्यप्रयोग, तसेच शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी रात्रौ ०८:००  वाजता महिलांचे सदाबहार कार्यक्रम व पैठणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमाचा ग्रामस्थ लाभ घ्यावा असे श्री देवी माऊली नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष समीर गावडे व सचिव राजेश मयेकर यांनी आवाहन केले आहे.