निगुडे रोणापाल मुख्य रस्ता ते आरोसकर टेंब रस्ता खडीकरण - डांबरीकरणाचा शुभारंभ

Edited by:
Published on: February 22, 2024 06:48 AM
views 84  views

बांदा : निगुडे रोणापाल मुख्य रस्ता ते आरोसकर टेंब रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी खासदार विनायक राऊत यांनी स्थानिक विकास कार्यक्रम २०२३/२४ अंतर्गत १० लाख मंजूर करण्यात आले होते. या रस्त्याच्या कामाच भूमिपुजन मंगळवार २० फेब्रुवारीला सायंकाळी खा. राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं.

यावेळी नाना खडपकर, पांडुरंग गावडे, निगुडे उपसरपंच गौतम जाधव, सदस्या क्षमीता नाईक, उबाठा गटाचे संपर्क प्रमुख शैलेश परब, समन्वयक बाळा गावडे, उप जिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, तालुका प्रमुख रूपेश राऊळ, आबा सावंत व राजू शेट्टी, इ.वि.प्र.फिलिप्स रॉड्रिग्ज, मळगाव वि.प्र.व ठेकेदार सुनील गावडे, आत्माराम नाईक गुरुजी, सिताराम नाईक, सोमा नाईक, दिलीप नाईक, सुभाष नाईक, चंद्रकांत नाईक,जना पवार, भगवान नाईक, गोविंद नाईक,भरत नाईक, सिध्देश नाईक, विशाखा चौकेकर, शोभा कुणकेरकर,प्राची कुणकेरकर, सुनिता नाईक, स्नेहल नाईक, सुश्मिता नाईक, भार्गवी नाईक, भरत नाईक, ज्ञानेश्वर नाईक, अंबाजी कुणकेरकर, मंगेश नाईक,संजू परब वामन नाईक, नीलेश नाईक, शंकर नाईक, विलास नाईक आदि उपस्थित होते.