
सावंतवाडी : निगुडे माजी सरपंच समीर गावडे यांच्यासह शेर्ले भाजपा माजी बूथ अध्यक्ष भाजपा गोपी मेस्त्री यांच्यासह अनेकांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. वेंगुर्ले येथे जाहीर सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी मशाल हाती घेतली आहे. या प्रवेशामुळे भाजपासह दीपक केसरकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी संकेत गावडे जूजे फर्नांडिस, सोमा नाईक, संदीप गावडे, अनिल नाईक, शामसुंदर सावंत, यशवंत जाधव, उमेश नाईक यांनी प्रवेश केला आहे.