
सावंतवाडी : निगुडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवस्थान निगुडेचा पहिला वर्धापन दिन दिनांक २७ व २८ जानेवारी २०२६ ला साजरा होणार आहे. तरी पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सग्रहमख नवचंडी व सत्यनारायण महापूजा कार्यक्रम आयोजित केलेले आहे. तसेच मंगळवार दिनांक २७ जानेवारी पहिला दिवस सकाळी ०८:०० वाजता मंगला चरण, प्रायच्छित विधी, यजमानांचे शरीरशुद्धीसाठी पंचगव्य प्राशने, सर्व देवतांना आवाहन प्रार्थना गणपती पूजन, पुण्याहवाचन, आचार्य वर्णन प्राकारस्थल शुद्धी, मुख्यदेवता स्थापना, सप्तशक्ती पाठवाचन, सुहासिनींसाठी कुंकूमार्जन परिवार देवतांवर अभिषेक पूजन हे कार्यक्रम होणार आहेत.
सकाळी ११:०० वा. सुवासिनींसाठी कुंकूमार्जन, दुपारी ०१:०० वाजता महाप्रसाद, रात्री ०९:०० वे.शा.सं. श्री गणेश उर्फ राजू जोशी यांचे प्रवचन पहिल्या दिवशीचे कार्यक्रम तसेच दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता रोणापाल, इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली गावचे शिमघडे मानकरी व ग्रामस्थ यांचे आगमन व स्वागत. सकाळी ०९:३० वाजता मंगलाचरण, अग्निस्थापना, सग्रहमख, सप्तशती हवन सत्यनारायण महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आचार्यादी ब्राह्मण पूजन, कुमारीका पूजन, कुष्मांडबलिदान, देवतांना प्रार्थना आरती व तीर्थप्रसाद दुपारी ०१:०० वाजता महाप्रसाद दुपारी ०३:०० वाजता माऊली देवीचे दर्शन ओटी भरणे, नवस पेडणे कार्यक्रम होणार आहेत.
तसेच रात्री ०८:०० वा.नवामीच्या मध्यरात्री गाजलेले ऐतिहासिक महानाट्य गणेश कला आणि सांस्कृतिक मंडळ हळर्ण, किल्ला गोवा आदी कार्यक्रम होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान प्रमुख मानकरी, नवरात्र उत्सव समिती, महिला कमिटी तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष रवींद्र शशिकांत गावडे व सचिव गुरुदास वासुदेव गवंडे यांनी केले आहे.










