बांद्यात निवडणुकीआधीच भाजपची ओपनिंग

प्रमोद कामत बिनविरोध ; सुशांत पांगमांची माघार
Edited by: विनायक गांवस
Published on: January 24, 2026 14:00 PM
views 122  views

सावंतवाडी : बांदा जिल्हा परिषदेतून भाजपचे उमेदवार माजी सभापती प्रमोद कामत बिनविरोध ठरले आहेत. अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.


माजी सभापती प्रमोद कामत यांची निवड बिनविरोध झाली असून विरोधी अपक्ष उमेदवारान अर्ज मागे घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेवर जिल्ह्याच्या सीमेवरून भाजपने ओपनींग केली आहे. माजी सभापती प्रमोद कामत यांना मानणारा पंचक्रोशीत मोठा वर्ग आहे. राजकारणासह सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. त्यामुळे त्यांना बिनविरोध पाठिंबा देत जिल्हा परिषदेवर पाठविण्यात आले आहे. या निवडीमुळे भाजपने जिल्ह्याच्या सीमेवरील मतदारसंघात कमळ फुलवल आहे.