
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे कार्यरत असलेल्या विद्युत अधिनियमांतर्गत स्थापन विशेष न्यायालयात (अतिरिक्त सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग – ओरोस) चाललेल्या एका खटल्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 अंतर्गत दाखल विशेष केस क्र. 13/2015 मध्ये न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला आहे.
या प्रकरणात आरोपी राजकुमार वायंगणकर यांच्यावर वीजचोरीचा आरोप ठेवण्यात आला होता.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी व आरोपी पक्षाकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर नोंदी न्यायालयाने तपासून पाहिल्या प्रकरणातील एकूण परिस्थिती, उपलब्ध पुरावे तसेच कायदेशीर बाबींचा सखोल विचार करता आरोपीविरुद्धचे आरोप समाधानकारकपणे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे संशयाचा लाभ देत न्यायालयाने आरोपीस सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला. या खटल्यात आरोपीची बाजू अॅड.आशिष लोके यांनी मांडली.










