
गुहागर : तालुक्यातील खोडदे गावचे रहिवाशी आणि आबलोली येथील बाजारपेठेतील वृत्तपत्र विक्रेते शंकर गंगाराम साळवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवारी, ता. १३ ऑगस्ट रोजी पहाटे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ५४ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सहा भाऊ, वहिन्या, बहिण असा मोठा परिवार आहे. शंकर साळवींच्या जाण्याने आबलोली परिसरात हळहळ होत आहे.