वेंगुर्लेतील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्री केसरकरांची घेतली भेट..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 13, 2023 10:48 AM
views 264  views

सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी मंत्री केसरकर यांनी त्यांचा सत्कार करत सर्वांनी गावाच्या विकासासाठी भरीव योगदान द्या अशा शुभेच्छा दिल्या.

तालुक्यातील खानोली पेंडूर व मातोंड या तीन ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये शिंदे सेनेचे उमेदवार मोठ्या मताधिकाक्याने निवडून आले. या निवडून आलेल्या सदस्यांनी मंत्री केसरकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी मातोंड ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब, विशाल बागायतकर, आर्या रेडकर, खानोली सदस्य बाळकृष्ण मेस्त्री, सचिन परब, अमिता खानोलकर, रूपाली प्रभुखानोलकर, प्रतिभा वरक यांच्यासह पेंडूर ग्रामपंचायत सदस्य निलेश वैद्य सुहासिनी वैद्य, रंजना हरजी उपस्थित होते. यावेळी मंत्री केसरकर यांनी सर्व निवडून आलेल्या सदस्यांना शुभेच्छा देत सर्वांनी गावाच्या विकासासाठी भरीव योगदान द्यावे राज्यात युतीचेच सरकार असल्याने आम्हाला श जे जे विकास काम गावासाठी मंजूर आहेत त्याला गती देण्याच काम करायच आहे. तसेच नव्याने विकास कामे आणण्यात येणार आहेत. येणाऱ्या काळात ग्रामपंचायत क्षेत्रात कायापालट केला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, सुभाष मोरजकर आदी उपस्थित होते.