शिरगांवात नवांगतांचे स्वागत !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 19, 2024 11:18 AM
views 126  views

देवगड : देवगड येथील शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगांव  येथील शिरगांव हायस्कूल च्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शाळेत नव्याने प्रवेशीत झालेल्या विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले.

शाळेत इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेतर्फे व संस्थेतर्फे दिनांक १८ जून २०२४ रोजी करण्यात आले. शिरगांव हायस्कूल चे माजी वरिष्ठ लिपिक  दिलीप पाळेकर यांच्या देणगीतून प्रत्येक विद्यार्थ्याला पेन व फूल भेट देऊन स्वागत करण्यात आले. या स्वगत कार्यक्रमास शाळेचे अधिक्षक रवींद्र जोगल,पर्यवेक्षक यु.जे रावराणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

या स्वागत कार्यक्रमास  दिलिप पाळेकर यांनी दिलेल्या देणगी बद्दल शाळेतर्फे व संस्थे तर्फे मुख्याध्यापक शिरगांव हायस्कूल यांनी आभार मानले.