वैभववाडीत नवगतांचे जोरदार स्वागत | पहील्याच दिवशी २८५ विद्यार्थी शाळांमध्ये दाखल

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 15, 2023 20:16 PM
views 346  views

वैभववाडी : तालुक्यातील १०१ प्राथमिक शाळांमध्ये पहीली इयत्तेत २८५ विद्यार्थी दाखल झाले.या नवगतांचे सर्व शाळांमध्ये पहील्या दिवशी जोरदार स्वागत करण्यात आले.

उन्हाळी सुट्टीनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.तालुक्यातील १०१ शाळांमध्ये पहील्याच दिवशी पहीली इयत्तेत २८५ विद्यार्थी दाखल झाले.या नवगतांचे जोरदार स्वागत करण्यात आले.नाधवडे येथील ब्रम्हाणदेववाडी येथे ढोलताशांच्या गजरात पहीलीच्या मुलांचे स्वागत करण्यात आले.या मुलांचे औक्षण देखील करण्यात आले.यावेळी माजी सभापती बाप्पी मांजरेकर, मुख्याध्यापक संजय पाताडे, शिक्षक व पालक उपस्थित होते. भुईबावडा येथील गांगेश्वर विद्यामंदिर पहील्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.गावचे सरपंच बाजीराव मोरे, गांगेश्वर विकास सोसायटी माजी चेअरमन मनोहर मोरे, गावच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सौ श्रेया मोरे , व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कुणाल मोरे उपाध्यक्ष उदय मोरे केंद्रप्रमुख श्री केळकर मुख्याध्यापिका सौ कुंभार मॅडम गावातील सर्व अंगणवाडी सेविका ग्रामस्थ उपस्थित होते.