
सावंतवाडी : सावंतवाडी येथील संजिवनी बालरूग्णालयामध्ये अॅडमिट असलेल्या ५ दिवसीय बालकाला A- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या प्लेटलेट्सची अत्यंत तातडीने गरज होती. तेव्हा सावंतवाडीतील पंकज बिद्रे यांनी ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन प्लेटलेट्स डोनेशन केले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. पाच दिवसांच्या बाळाला जीवनदान दिल्याबद्दल पंकज बिद्रे यांचे आभार मानण्यात आले. या बालकाला जीवनदान देण्यासाठी भाजप जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक यांनी देखील विशेष प्रयत्न केले.