SPK त नवमतदार नोंदणी कँम्प ; तहसीलदार श्रीधर पाटील यांचं मार्गदर्शन

Edited by: विनायक गावस
Published on: August 03, 2023 11:57 AM
views 154  views

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नवमतदार नोंदणी कँम्प आयोजित करण्यात आला होता. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार श्रीधर पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कँम्पमधील विद्यार्थ्यांकडून Voter Helpline App,  व hattp://Voter.eci.giv.in या वेबसाईटवर आँनलाईन फाँर्म भरून घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी निवडणूक नायब तहसिलदार, नगरपालिका सावंतवाडी कार्यक्षेत्रातील सुपरवायझर व बी.एल.ओ. , निवडणूक शाखेतील कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना फाँर्म भरणेस सहकार्य व मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारमल व उपप्राचार्य ठाकूर यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन करून नव मतदार नोंदणीस सहकार्य केले.