राजकारणात नवीन, मात्र सावंतवाडीच्या विकासाची जिद्द

युवराज्ञींचं खणखणीत भाषण
Edited by: विनायक गांवस
Published on: November 25, 2025 12:09 PM
views 67  views

सावंतवाडी : सावंतवाडीतून निवडणूक लढण्याची संधी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, युवराज लखमराजे भोंसले यांचे आशीर्वाद मला आहेत. सावंतवाडीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला अस मत नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केले. 

येथील जनता मला आशीर्वाद देत आहे. तीच माझी ताकद आहे‌. सावंतवाडीच्या विकासाच व्हिजन आम्ही घेऊन जात आहोत. राजेसाहेब रघुनाथ महाराज यांनी ड्रेनेज सिस्टीमच नियोजन केलं होतं. आता फिरताना टाऊन प्लानिंग, रोजगार, आरोग्य, पर्यटन, मनोरंजन सुविधा वाढवण्यासाठी माझा भर राहिल. माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमे, बिझनेस मॅनेजमेंट मध्ये झालय. त्यामुळे येथील रोजगार वाढवण्यासाठी माझा भर राहणार आहे. महिला, युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी माझा भर असेल. येथील उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान देण्यासाठी माझा भर असेल‌ असं मत व्यक्त केले. 

मी सावंतवाडीची सून असल्याचा अभिमान आहे‌. राजघराण्याचा वारसा मी पुढे घेऊन जात आहे‌. सावंतवाडीची मुलगी, सुन म्हणून मला लोकांनी स्वीकारल आहे‌‌. राजकारणात मी नवीन आहे. पण, विकसीत सावंतवाडी माझी जिद्द आहे‌. भाजपच्या आशीर्वादाने पाच वर्षांत सावंतवाडीचा कायापालट करून दाखवणार, आमच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन केलं ‌