किंजवडेत नव्या मेडिकल स्टोअरचं उद्घाटन

Edited by:
Published on: May 02, 2025 11:22 AM
views 61  views

देवगड : देवगड तालुक्यातील किंजवडे येथे पहिल्या वहिल्या मेडिकल स्टोअरचे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते झाले. पल्लवी कमलाकर चव्हाण आणि कमलाकर चव्हाण यांच्या मालकीचे 'प्रकाश मेडिकल' स्टोअर सुरू करण्यात आले.

यावेळी दत्ताराम कदम, संतोष किंजवडेकर, डॉ.विठ्ठल जाधव, जाधव सर ,पुट्टेवाड सर ,गजानन कदम,प्रथमेश कदम,उमेश चव्हाण राजेंद्र चव्हाण,सागर लाड,भगवान चव्हाण,माजी नायब  तहसीलदार मारुती टार्पे, युधिराज राणे ,चंद्रशेखर तावडे ,आर्यन चव्हाण, सुहास किंजवडेकर,रोहन गाडी,रामचंद्र परब,आदर्श विद्यामंदिर किंजवडे कार्याध्यक्ष सत्यवान ठाकूर आणि किंजवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.एक चांगली वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात सुरू झाल्याने सर्वसामान्य लोकांना याचा लाभ होणार आहे.