
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा तिन्ही शाखांचा मिळून एकूण निकाल ९४.९५ टक्के एवढा लागला असून, विज्ञान विभागातून मिहिर चंद्रशेखर बालम आणि तन्वी कृष्णा चव्हाण ,वाणिज्य विभागातून तन्वी हनुमंत जगताप तर कला विभागातून सेजल अनिल गावडे प्रथम
कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल कसाल आणि कनिष्ठ महाविद्यालय कसाल या प्रशालेचा तिन्ही शाखांचा मिळून 94.95% एवढा निकाल लागला आहे. या विद्यालयातून तिन्ही शाखातून मिळून एकूण 197 विद्यार्थी परीक्षेत बसले होते यापैकी 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या प्रशाळेचा वाणिज्य विभागाचा निकाल 99.6% एवढा लागला आहे. या विभागातून एकूण 106 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मिहीर चंद्रशेखर बालम आणि तनवी कृष्णा चव्हाण हे दोन विद्यार्थी 67.17% एवढे गुण मिळवून प्रथम आले आहेत. तर तनिषा हनुमंत जगताप ६५.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कविता शशिकांत कसालकर 62.33% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
या प्रशालेतील वाणिज्य शाखेचा निकाल ९५.५८ टक्के एवढा लागला असुन या विभागातून 68 विद्यार्थी परीक्षेत बसले होते यापैकी 65 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विभागातून 80.17% गुण मिळवत तन्वी महेश नाईक हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर 75.67 गुण मिळवत वेदांत शामसुंदर दळवी द्वितीय आणि 74 टक्के गुण मिळवून सिद्धी रवींद्र राणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कला विभागाचा निकाल 73.91% एवढा लागला आहे. या विभागात एकूण 23 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी 17 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विभागातून सेजल अनिल गावडे 56.17 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक. तर अक्षता राघो कदम ४९.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि तुषार प्रकाश राणे 48.67 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.