पुतण्या, पुतणी यांनी काकांच्या आठवणी जागवल्या

आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात ‘आठवणीतले जयाकाका ’गप्पांचा कार्यक्रम रंगला
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 13, 2025 18:46 PM
views 44  views

कणकवली : जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘आठवणीतले जयाकाका’ यावर पुतण्या पुरुषोत्तम उर्फ सचिन दळवी व पुतणी नीला इनामदार यांची प्रसाद घाणेकर यांनी वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात मुलाखत घेतली. यात दोघांनी जयवंत दळवींच्या आठवणींनी उजाळा दिला. गेल्या अर्धशतकांहून अधिक काळ अमेरिकेत वास्तव्य असलेल्या नीला यांनी अमेरिकेत जयवंत दळवी यांची नाटके सादर करताना वाटलेली आपुलकी आणि अभिमान यांचाही उल्लेख केला. या जन्मशताब्दीवर्षाच्यानिमित्ताने आपण जयवंत दळवी यांची ३२ पुस्तके वाचल्याने ते आपल्याला अधिक कळले आणि जवळचे वाटू लागले, अशी भावना सचिन दळवी यांनी व्यक्त केली. जयवंत दळवी यांनी लिहिलेली पुस्तकेही वाचकांनी वाचावी, ही त्यांना खºया अर्थाने श्रद्घांजली ठरेल, अशी भाविकांनी उपस्थितांनी व्यक्त केली. 

जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सुदेश बिले यांच्या हस्ते झाले. यावेळी वामन पंडित, प्रकाश मुसळे, जयवंत दळवी यांची पुतणी नीला इनामदार व पुतण्या सचिन दळवी उपस्थित होते. 

आपल्याला निर्माण करताना आपल्यावर अन्याय झाला आहे अशी फिर्याद करत जयवंत दळवी यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडणारा धमार्नंद आणि त्याच्या प्रश्नांना उत्तरे देणारे दळवी या अभिनव पत्रव्यवहाराचे अभिवाचन प्रसाद घाणेकर व नीलेश  कोदे यांनी केले. 

धमार्नंद कादंबरीचा नायक धमार्नंद आणि लेखक जयवंत दळवी यांच्यातील हा पत्रव्यवहार हा दळवी यांच्या समग्र लेखनाचे आणि त्यांच्या असंख्य वाचकांना पडणाºया शंकांचे प्रातिनिधिक रूप असल्याने त्याची निवड केल्याचे घाणेकर यांनी वाचनापूर्वी सांगितले. अभिवाचनानंतर जयवंत दळवी यांची पुतणी नीला इनामदार आणि पुतण्या सचिन दळवी यांच्याशी 'आठवणीतले जयाकाका' हा गप्पांचा कार्यक्रम झाला. संवादक प्रसाद घाणेकर यांच्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे देत घरातील जयवंत दळवी व लेखक जयवंत दळवी यांच्या काही आठवणी नीला व सचिन यांनी सांगितल्या. घरात वावरताना लेखक म्हणून त्यांचे कधीच दडपण आणि वेगळेपण जाणवले नाही, असे दोन्ही भावंडांनी सांगितले. दहावीच्या वर्षात घरातील वडीलधाºया माणसांपासून लपवत आपण काकांची चक्र ही कादंबरी कशी वाचली आणि इतकी माहिती काकांनी कशी मिळवली असेल याचे कुतूहल आपल्याला पडल्याचे नीला यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अ‍ॅड एन.एन. देसाई, विश्वस्त डॉ. समीर नवरे,दामोदर खानोलकर,राजा राज्याध्यक्ष, शरद सावंत, लीना काळसेकर,चित्रा कोदे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सुनील पाटील, डॉ. दर्शना कोलते, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. बाळकृष्ण गावडे, विलास बुचडे, सीमा कोरगावकर, सोनाली कोरगावकर, धनराज दळवी, मनोज मेस्त्री, ज्योती पंडित, उज्ज्वला धानजी आदी उपस्थित होते.