
कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवेचा सन 2023- 24 च्या SSC परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून कुमारी महवीश मुल्ला हिने 94.20% मार्क मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर नील लोकरे याने 93% मार्क मिळवून द्वितीय क्रमांक पटकवला आहे. तर जोया पटेल हिने 92.80% मार्क मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सन 2004 पासून सुरू असलेल्या या शाळेची ही अकरावी SSC ची बॅच आहे.
शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादित केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे अध्यक्ष मनोज गुळेकर, सेक्रेटरी मोहन कावळे, खजिनदार परवेज पटेल, सहसचिव राजेंद्र ब्रह्मदंडे, कार्याध्यक्ष रघुवीर राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. निता शुक्ला, मुख्याध्यापिका श्रीमती. निलम डांगे, समन्वयक अभय तावडे, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी केले आहे तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.