देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत नेमळे विद्यालय प्रथम

लहान गटात द्वितीय क्रमांक
Edited by: विनायक गावस
Published on: August 23, 2023 15:01 PM
views 60  views

सावंतवाडी : लोकमान्य मल्टीपर्पज को – ॲापरेटिव्ह सोसायटी यांच्यावतीने आयोजित वंदे मातरम् समूहगीत गायन आणि नृत्य स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत पाचवी ते सातवी या वयोगटात एकूण ७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर आठवी ते दहावी या वयोगटात एकूण ८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील शाळांनी आपला सहभाग नोंदवला.


विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज को- ॲापरेटिव्ह सोलायटीकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील समूहगीत गायन स्पर्धेत लहान गटात श्री जनता विद्यालय तळवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे यांनी व्दितीय क्रमांक पटकावला आहे तर मोठ्या गटात नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून व्दितीय क्रमांकाचे मानकरी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली ठरले आहे.


नेमळे हायस्कुल च्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री आ भि राऊळ सर ,मुख्याध्यापिका सौ कल्पना बोवलेकर मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,सर्व संस्था पदाधिकारी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दादा राऊळ, श्री म्हाडेश्वर यांनी मुलांचे व मार्गदर्शक शिक्षक श्री नितिन धामापूरकर यांचे अभिनंदन केले