नेमळे मुख्य रस्ता ते रवळनाथ मंदिर रस्ता - कॉजवेच्या नूतनीकरण कामाचे भूमीपूजन

Edited by: विनायक गावस
Published on: February 21, 2024 14:35 PM
views 39  views

सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मंजूर मळगाव नेमळे मुख्य रस्ता ते रवळनाथ मंदिर पर्यंत जाणारा रस्ता आणि कॉजवेच्या नूतनीकरण कामाचे भूमीपूजन भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, माजी सभापती राजू परब, सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच गणेश पेडणेकर, निलेश कुडव, दादा परब, गुरुनाथ गांवकर, निळकंठ बुगडे, दीपक जोशी, प्रकाश जाधव, पांडुरंग राऊळ, प्रेमनाथ राऊळ, नवनाथ राऊळ, तात्या लातये, प्रसाद नाईक यांच्यासह  ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच जिल्हा नियोजन मधून मंजूर मळगाव बादेकरवाडी येथील  स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर  यांच्या हस्ते तर माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच जिल्ह्याचे पालकमंंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पुलाचे भूमीपूजन करण्यात आले. तर  पांडुरंग राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी मळगांव सरपंच  हनुमंत पेडणेकर, माजी सभापती राजू परब, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, शक्तिकेंद्र प्रमुख निळकंठ बुगडे, तात्या लातये, दिपक जोशी, नवनाथ राऊळ, निखिल राऊळ, दादा परब, प्रमोद गावडे व कार्यकर्ते उपस्थित होते.