'माझी माती, माझा देश' ; नेमळे ग्रा. पं. तीत घेतली पंचप्राण शपथ

Edited by: विनायक गावस
Published on: August 11, 2023 15:19 PM
views 202  views

सावंतवाडी : माझी माती माझा देश या अभियाना अंतर्गत 9 ऑगस्ट 2023 या क्रांती दीना निमित्त नेमळे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या जल्लोषात हा उपक्रम राबविण्यात आला. या अभियानामध्ये नेमळे गावातील ग्रामपंचायत, शाळा,आरोग्य विभाग,तलाठी यांचे मोठया प्रमाणात योगदान मिळाले. या माझी माती माझा देश या कार्यक्रमात ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख तसेच माजी  पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ उपस्थित होते.

या उपक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत आवारामध्ये शिलाफलक उभारून शहीदाना मानवंदना देण्यात आली.  यानंतर ध्वजारोहण करून देशाप्रति दिवे हातात घेऊन एकजुटीने एकत्र काम करण्याची सर्वानी पंच प्राण शपथ घेतली. यानंतर निवृत्त माजी सैनिकांचा तसेच देशासाठी शाहिद झालेल्या कुटूंबातील सदस्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नेमळे गावातील ज्या रोप वाटिका धारकांनी नेमळे ग्रामपंचायतिला वेगवेगळ्या जातीची फळझाडे त्या सर्व रोपवाटिका मालकांचे ग्रामपंचायत सरपंचा कडून सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम राबविण्याचे महत्व सांगितले यावेळी नेमळे सरपंच दीपिका भैरे उप सरपंच सखाराम राऊळ सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक चौहान, तलाठी पाटोळे, अंगणवाडी सेविका, आशा, आरोग्य कर्मचारी, जि प शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.