पिंपळपानच्या लावणी स्पर्धेत नेहा डींगणकर - उर्मी काळबेकर प्रथम

Edited by: संदीप देसाई
Published on: October 26, 2023 20:03 PM
views 106  views

दोडामार्ग : पिंपळपान हौशी महिला मंडळ बाजारपेठ दोडामार्गच्या वतीने नवरात्र उत्सवात आयोजित लावणी स्पर्धेत मोठ्या गटांतर्गत मणेरी येथील नेहा बुधाजी डींगणकर हिने तर लहान गटांतर्गत दोडामार्ग शहरातील उर्मी किरण काळबेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या लावणी स्पर्धेला महिला प्रेक्षक वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला.

येथील सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवात दोडामार्ग बाजारपेठेतील पिंपळपान हौशी महिला मंडळाने विशेष लावणी स्पर्धा ठेवली होती. मोठ्या गटातील नेहा    डिंगणकर प्रथम क्रमांकाचे तीन हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. तर तळकट येथील सानिका सावंत हिने द्वितीय क्रमांकाचे दोन हजार रुपये व वैभवी गवस इब्रामपूर.  पेडणे (गोवा ) हिने तृतीय क्रमांकाचे एक हजार रुपये पारितोषिक पटकावले.

लहान गटामधील उर्मी काळबेकर तिने दोन हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. तर आर्या  ताटे हिने द्वितीय क्रमांकाचे 1000 रुपये व दुर्वा उगाडेकर हिने तृतीय क्रमांकाचे सातशे रुपये पारितोषिक पटकावले. मोठ्या गटांमध्ये संजना सोमा नाईक रा.बिजगर  व लहान गटामधील साईच्छा साळकर रा.दोडामार्ग यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. या लावणी स्पर्धेसाठी वेंगुर्ले येथील उर्मिला पेडणेकर व दोडामार्ग मधील उत्कर्षा मळीक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन आनंद कामत यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.