
सावंतवाडी : मोती तलाव येथील पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुतळ्यानजीक असलेल्या सांडव्यामध्ये नगरपरिषदेच्या मार्फत काहीवर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या कृत्रिम पशु - प्राणी आकर्षण होते. मात्र, सद्यस्थितीत हा परिसर दुर्लक्षीत झाला असून पुन्हा एकदा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन सामाजिक बांधिलकीन केल आहे. यामध्ये पट्टेरी वाघ, हरीण,सांभर व पांढरे बगळे पर्यटकांचे लक्ष वेधत होते. तो परिसर पर्यटनाचा भाग बनला होता. मात्र, आजच्या घडीला त्या ठिकाणी बसविलेले काही पशु-प्राणी नाहीसे झालेले दिसतात. या परिसराची देखभाल दुरुस्ती ठेवण्याची पूर्ण जबाबदारी ही सावंतवाडी नगर परिषदेची होती. परंतु, त्यांच्या दुर्लक्षेतेमुळे हा भाग ओसाड बनला आहे. याबाबत सावंतवाडी शहरातील ज्येष्ठ नागरिक, निसर्गप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून अशा नगरपरिषदेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नुकत्याच सावंतवाडी मोती तलावाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख ७१ हजार रुपये एवढा निधी मंजूर झाला असून सदर मंजूर निधीमधून काही रक्कम कृत्रिम पशु-प्राणी यांचे नूतनीकरण कराव तसेच त्या ठिकाणच्या बॅरीगेटची उंची वाढवावी. जेणेकरून पुन्हा कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ नये याची काळजी नगर परिषदेने घ्यावी. अशा पद्धतीने या परिसराचा विकास करून तो परिसर सुशोभित करावा. त्या ठिकाणचं पर्यटन वाढवावे असं आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव ,ज्येष्ठ नागरिक व निसर्गप्रेमी यांच्याकडून नगरपरिषदेला करण्यात आलं आहे.