हस्ताक्षर स्पर्धेमध्ये नील बांदेकर राज्यात प्रथम

Edited by: विनायक गावस
Published on: November 10, 2023 16:26 PM
views 95  views

सावंतवाडी : अष्टपैलू संस्कृती कला अकादमी  मुंबई आयोजित राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत केंद्र शाळा बांदा येथे इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.  यासाठी नीलला त्याचे मामा बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश सावंत यांचे योग्य असे मार्गदर्शन लाभले. नीलने आतापर्यंत वेशभूषा, कथाकथन,चित्रकला, वक्तृत्व, निबंध ,गीत गायन ,हस्ताक्षर, यांसारख्या अनेक विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन 150 हुन जास्त बक्षीस पटकविली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल नीलवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.