बेदरकारपणे गाडी चालकांवर लगाम आवश्यक

Edited by:
Published on: March 10, 2025 20:40 PM
views 237  views

देवगड :  देवगड - निपाणी महामार्गावरती  वाहन चालकांच्या बेदरकारपणे वाहने चालवल्यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण फार वाढलेले आहे. येत्या काळात अनेक रस्ते अपघाताच्या बातम्या समोर आल्या. बऱ्याचदा या अपघातांचे चालू रस्त्यावर गाडी चालवताना नेहमी रस्ते नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तरीही काही चालक या नियमांचे पालन करत नाही आणि दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालऊन आपल्या बरोबरच इतरांचा जीव देखील धोक्यात घालतात व इतरांना अपघाताला बळी पाडतात.

आपण केलेली एक शुल्लक चूक आपल्याच काय तर समोरच्या जीवावर देखील बेतू शकते. सध्या याचीही प्रचिती देणाऱ्या एका भीषण अपघात हडपिड येथे होता होता थोडक्यात निभावल तळेबाजार येथील एका कुटुंबातील चार व्यक्ती त्यांच्या एका कार्यक्रमासाठी त्यांच्या ताब्यातील गाडी न.9648,या गाडीतून बेळगावला जात असताना राकसघाटी या ठिकाणी एका परप्रांतीय मद्यधुंद अवस्थेतील ट्रक  न.52 A5995 या ट्रक वरील चालकाने ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परप्रांतीय ट्रक चालकाकांकडून असे बेदरकरपणे गाडी चालवण्याचे प्रसंग अलीकडे वाढले असून, त्यामुळे हकनाक निष्पाप लोकांचे जीव जाण्याचे प्रसंग ओढवत आहे. देवगड - निपाणी या महामार्गवरती वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता या बेदरकारपणे गाडी चालकांवर लक्ष्य ठेऊन त्यांना प्रशासनाने लगाम घालने गरजेचे आहे, असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.