
दोडामार्ग | लवू परब : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची स्थिती फारशी चांगली नाही. अपुरे तज्ञ डॉक्टर, स्टाफ, यंत्र सामुग्री या सर्व गोष्टी मुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. यामुळे हे रुग्णालय असून नसल्यासारखेच आहे असं म्हटल तर वावग ठरणार नाही.
असं असतानाही मात्र, उपजिल्हा रुग्णालंयाच्या दर्जाचे नवीन रुग्णालंय त्या ठिकाणी बांधण्याचे काम सुरु आहे. आहे त्या रुग्णालयात चांगल्या व्यवस्था न देता नवीन रुग्णालय इमारत करणे कितपत योग्य असा सवाल नागरिकांतून केला जातोय.
दोडामार्ग तालुक्यात आरोग्याची कोणतीच चांगली व्यवस्था नाही. मोठ्या आजारपणात प्रत्येक वेळी गोवा राज्यात जावे लागते. यासाठी तालुक्यात उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय बांधण्याचे काम सुरु आहे. ३५ कोटी रु. खर्च करून या नवीन इमारतीचे काम करण्यात येत आहे. मात्र, ३५ कोटी रुपये खर्च करून डॉक्टर, नर्स, स्टाफ भविष्यात येणार काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो.
हे महायुती सरकारचे अपयश : बाबुराव धुरी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना दोडामार्ग तालुक्यात आरोग्याची सुसज्ज इमारत असावी या दृष्टीने त्या सरकारने नवीन इमारत मंजूर केली होती. मात्र, आताचे सरकार हे याठीकाणी वैद्यकीय सेवा देऊ शकत नाहीत. हे आजच्या सरकारचे अपयश आहे अशी टीका शिवसेनच्या बाबुराव धुरी यांनी केली आहे.
पुन्हा जनआंदोलन उभारावं लागणार : वैभव ईनामदार
दरम्यान, जनआक्रोश आंदोलनाच्या यशामुळे या ठिकाणी उपजिल्हा दर्जाचे रुग्णालंय बांधण्यात येत आहे. गेल्या वर्ष भरापासुन या रुग्णालयात एकाही स्त्रीची प्रसूती झाली नाही. रुग्णालयात असलेल्या स्टाफला राहण्यासाठी सोय नाही. ३५ कोटींच्या इमारतीमध्ये स्टाफ आला तर चांगलीच गोष्ट नाही तर जनआक्रोश आंदोलनासारखे मोठे आंदोलन दोडामार्गत उभारावे लागणार असल्याच वैभव ईनामदर यांनी संगितले.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डॉक्टरच नसल्याची रूग्णांची तक्रार...
आज सोमवारी ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे रुग्ण डॉक्टरांची वाट बघत बसले होते. मात्र, डॉक्टर त्यांच्या दालनात नसल्याचे दिसून आलेत. तसचं एक्सरेचे डॉक्टर मनमानी कारभार करत असल्याचा आरोप अनेक रूग्णांनी केलाय.