
दोडामार्ग : दोडामार्ग महसूल विभाग व राष्ट्रीय आपदा मोचन (एनडीआरएफ ) यांच्या वतीने बुधवारी विशेष प्रात्यक्षिक शिबीर आयोजित करून नैसर्गिक आपत्ती मध्ये स्वतःचा व इतरांना मदत कार्य बचाव कार्य कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन दिले.
लक्ष्मीबाई सिताराम हळबे कॉलेज मध्ये आयोजित प्रात्यक्षिक शिबिरात एनडीआरएफ चे अधिकारी इन्स्पेक्टर प्रभिशा, व उपनिरीक्षक विजय म्हस्के यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी यांना प्रशिक्षण दिले. यावेळी त्यांच्या सोबत हवालदार मुकुंद शेळके, अनिरुद्ध गवांडे, श्याम फापले, शिपायी छत्रपती खांदवे, चेमटे वाल्मिक, गडाख विकास, दोडामार्ग मंडळ अधिकारी शरद शिरसाट, तलाठी तुकारम गायकवाड, संग्राम तराळ, कोतवाल कांबळी आदी व म्हविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व प्रथम उपस्थित एनडीआरएफ च्या सर्व अधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. त्या नंतर उपनिरीशक म्हस्के व त्यांचे अधिकारी यांनी भुस्खलन, नदीला पूर, आग या सर्व गोष्टी पासून स्वतःला बचाव कार्य कसे करणार इतरांना मदत कशी करावी यांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखवली. व स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेऊन देशाचे शिपायी बना देशात साठी लढा असे उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन ही करण्यात आले.