
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंसह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसह तरुण युवक- युवतींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपला पुढाकार असणार आहे. राजकारणापेक्षा अधिक समाजकारणात लक्ष देत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असून येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मैदानात उतरले असून महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीला यश मिळेल असा विश्वास अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला.
तर आगामी काळात महाराष्ट्रात सावंतवाडीच नेतृत्व अर्चना घारे-परब यांनी करावं अशा शुभेच्छा कार्यकर्त्यांनी दिल्या.सर्व स्तरातून अर्चना घारे-परब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, उद्योजक संदीप घारे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, उद्योग व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, रत्नागिरी निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, महिला शहराध्यक्ष अँड. सायली दुभाषी, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, सावली पाटकर, पूजा दळवी,अँड. सिद्धी परब, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, बावतीस फर्नांडिस, संतोष जोईल, इफ्तेकार राजगुरू, याकुब शेख, नियाज शेख, सिद्धेश तेंडुलकर, आगस्तीन फर्नांडिस, अशोक पवार, फैज शेख, रोहन परब, विनायक उर्फ दिपू परब, वैभव परब, मनोज वाघमोरे आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.